शरद बुट्टे पाटील : परिसरतील विविध विकासकामांचे उद्घाटन
शिंदे वासुली- शिंदे (ता. खेड) येथील “मुक्तीधाम’ स्मशानभूमी परिसरात विविध विकासकामांचे हभप शंकर महाराज मराठे व रोहिदास महाराज हांडे यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन पार पडले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी येथील कार्यकर्त्यांचा आग्रह, शिंदे ग्रामपंचायतीने घेतलेला पुढाकार व जिल्हा परिषदेच्या निधीच्या माध्यमातून स्मशानभूमी, दशक्रिया घाट, परिसर सुशोभीकरण करणे शक्य झाले, असे माहिती देताना सांगितले.
यामध्ये शिंदे गावातील सोसायटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुनील घनवट, विनायक पानमंद, सुनील देवकर, गोरक्षनाथ टेमगीरे, रोहिदास टेमगीरे व बाळासाहेब रघुनाथ टेमगीरे या दानशूर ग्रामस्थांनी रस्त्यावरील प्रवेशद्वार उभारण्यासाठी आर्थिक सहकार्य केले. तसेच सामाजिक कार्यकर्ते मारुती माताळे दशक्रिया घाटावर आसन व्यवस्था करत आहेत. याशिवाय येथील ग्रामस्थांनी श्रमदान करून स्मशानभूपरिसरात वृक्षारोपण केले. पुढील काळात याठिकाणी पाण्याची टाकी, पार्किंगसाठी वाढीव व्यवस्था करण्याचा ग्रामपंचायत व जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांचा मानस आहे.
याप्रसंगी भाजपा खेड तालुका अध्यक्ष अतुल देशमुख, बाजार समिती सभापती बाळशेठ ठाकूर, माजी सभापती चंद्रकांत इंगवले, विनोद महाळूंगकर, हभप शंकर महाराज मराठे, हभप हांडे महाराज, राष्ट्रवादी पश्चिम विभाग अध्यक्ष अमोल पानमंद, सचिन देवकर, काळूराम पिंजण, शिंदे वासुली सोसायटीचे अध्यक्ष सुनील घनवट, बापू पाचारणे, राहूल पानमंद, अमोल झिंजुरके, कांताराम पानमंद, दत्तात्रय टेमगीरे, विजय घनवट, निलेश पानमंद, नारायण बोरकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.