मेलबर्न : सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने रविवारी आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेतील पुरूष एकेरीचे विजेतेपद पटकावले. जोकोविचने आॅस्ट्रियाच्या डाॅमिनिक थिमचा अंतिम सामन्यात पराभव केला. पाच सेटमध्ये रंगलेल्या या सामन्यात जोकोविचने बाजी मारली. अंतिम फेरीत जोकोविचने थिमवर ६-४, ४-६, २-६, ६-३, ६-४ असा विजय मिळवत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
NOV8K DJOKOVIC!!!
🇷🇸 @DjokerNole wins his EIGHTH (!!) #AusOpen title after defeating Thiem 6-4 4-6 2-6 6-3 6-4! 🏆 pic.twitter.com/0Z888LBKQa
— ATP Tour (@atptour) February 2, 2020
जागतिक क्रमवारीत २६ वर्षीय थिम ५ व्या, तर ३२ वर्षीय जोकोविच दुस-या क्रमांकावर आहे. यापूर्वी दोघे १० वेळा आमनेसामने आले होते. यात जोकोविचने ६ वेळा तर थिमने ४ वेळा बाजी मारली होती.
🏆 2008
🏆 2011
🏆 2012
🏆 2013
🏆 2015
🏆 2016
🏆 2019
🏆 2020Simply sensational from Djokovic.@DjokerNole | #AusOpenpic.twitter.com/Vx3phft9va
— ATP Tour (@atptour) February 2, 2020
३२ वर्षीय जोकोविचचे हे आॅस्ट्रेलियन ओपनचे ८ वे तर कारकिर्दीतील १७ वे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. याआधी जोकोविचने २००८, २०११, २०१२, २०१३, २०१५, २०१६ आणि २०१९ मध्ये आॅस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते.
THIEM TO THE FINAL!@ThiemDomi will play @DjokerNole in the #AusOpen final, after defeating Zverev 3-6 6-4 7-6 7-6 to reach his first @AustralianOpen final. pic.twitter.com/HSUftH4bo1
— ATP Tour (@atptour) January 31, 2020
दरम्यान, आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत शुक्रवारी २६ वर्षीय पाचव्या मानांकित डाॅमिनिक थीमने जर्मनीच्या अॅलेक्झँडर झ्वेरेव्हचे आव्हान ३-६, ६-४, ७-६(७-३), ७-६(७-४) असे परतवून लावत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. दुसरीकडे दुस-या मानांकित जोकोविचने राॅजर फेडररला नमवून गुरूवारीच अंतिम फेरीत प्रवेश केला होता. उपांत्य फेरीच्या सामन्यात जोकोविचने फेडररला ७-६, ६-४, ६-३ असे नमवले होते.