अहमदाबाद – कोविड रूग्णांच्या सेवेत कार्यरत असलेल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या विद्यावेतनात आणि भत्त्यात वाढ करावी या मागणीसाठी गुजरात मधील सुमारे बारा सरकारी रूग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स संपावर गेले आहेत.
आमचा हा संप बेमुदत आहे असे त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. ही ड्युटी करणाऱ्या बाहेरील राज्यातील डॉक्टरांना 20 हजार रूपये स्टायपेंड दिला जात असून गुजरात मध्ये अजूनही केवळ साडे बारा हजार रूपयांमध्येच आम्हाला राबवून घेतले जात आहे.
आमचा दैनंदिन भत्ताहीं किमान एक हजार रूपये करावा अशी त्यांची मागणी आहे. ही वाढीव वेतनाची थकबाकी एप्रिल महिन्यापासून दिली जावी अशीही त्यांची मागणी आहे. सरकार आमची मागणी मान्य करे पर्यंत आम्ही कोविड किंवा अन्य कोणतीहीं ड्युटी करणार नाही असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे.
गुजरातमधील चौदा सरकारी रूग्णालयातील सुमारे दोन हजार प्रक्षिणार्थी डॉक्टर या संपात सहभागी आहेत असा दावाही त्यांच्या संघटनेने केला आहे. कोविड काळात आम्ही अविश्रांतपणे काम करीत आहोत पण राज्य सरकारचे आमच्या हिताकडे लक्ष नाही असा आरोपही त्यांनी केला आहे.