अर्जुन कपूर आणि परिणिती चोप्राचा “संदीप और पिंकी फरार’ 19 मार्च रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमाचे ट्रेलर रिलीज झाले आहे. हा ट्रेलर अतिशय सस्पेन्सने भरलेला आहे. ट्रेलर बघून सिनेमाच्या कथानकाचा अंदाज येतो.
View this post on Instagram
मात्र सिनेमामध्ये नक्की काय चालले आहे, हे समजू शकत नाही. सिनेमाच्या प्रॉडक्शन टीमने ट्रेलर सोशल मिडीयावर रिलीज केला. ट्रेलरमध्ये अर्जुन कपूर आणि परिणिती चोप्रा एका रेल्वे स्टेशनवर दिसतात. पहिल्यापासूनच या दोघांमध्ये काही तरी तणाव असल्याचे लगेच लक्षात येते.
View this post on Instagram
परिणितीला मारण्याचा प्रयत्न सतत अर्जुन कपूर करत असतो. त्याचबरोबर तिला सतत सीमेबाहेर नेण्याचीही भषा तो करत असतो. या ट्रेलरच्या अखेरीस अर्जुन कपूर चक्क परिणितीचा गळा दाबून तिला मारण्याचा प्रयत्न करत असताना दिसते. त्यामुळे या दोघांमध्ये नक्की काय रिलेशन आहे, याची उत्सुकता प्रेक्षकांना निर्माण झाल्याशिवाय रहात नाही.
View this post on Instagram
हे ट्रेलर या सिनेमाचे दुसरे ट्रेलर आहे. पहिला ट्रेलर गेल्या वर्षी 4 मार्चला रिलीज झाला होता. मात्र करोनाच्या लॉकडाऊनमुळे सिनेमाचा रिलीज पुढे ढकलावा लागला होता. अर्जुन आणि परिणितीचा हा एकत्र काम केलेला तिसरा सिनेमा आहे. यापूर्वी “इश्कजादे’ आणि “नमस्ते इंग्लंड’मध्ये या दोघांनी एकत्र काम केले होते.