भूमी पेडणेकरच्या “बधाई दो’चे शुटिंग आता पूर्ण झाले आणि ती आपल्या आगामी सिनेमाच्या तयारीला लागली आहे. शशांक खेतानच्या “मिस्टर लेले’मध्ये तिची एन्ट्री होणार आहे, असे समजते आहे. भूमीच्या व्यतिरिक्त “मिस्टर लेले’मध्ये विकी कौशल आणि कियारा आडवाणीही लीड रोलमध्ये असणार आहेत. “मिस्टर लेले’ हा एक कॉमेडी सिनेमा असणार आहे. विकी कौशलला प्रथमच पडद्यावर कॉमेडी करताना प्रेक्षक बघणार आहेत.
View this post on Instagram
विक्रीच्या रोलमध्ये महाराष्ट्रीय मऱ्हाठमोळेपणा दिसणार आहे, तर भूमी आणि कियाराचा रोल कशाप्रकारचा असेल, हे समजू शकलेले नाही. यापूर्वी विकी आणि कियारा “लस्ट स्टोरीज’मध्ये एकत्र होते. पण त्यांच्या आगोदर वरुण धवन आणि जान्हवी कपूरची या रोलसाठी निवड झाली होती.
View this post on Instagram
मात्र प्रोड्युसर करण जोहरने काय विचार केला कोणास ठाऊक आणि वरुण आणि जान्हवी दोघेही सिनेमातून आऊट झाले आणि विकी-कियारा जोडीची वर्णी लागली. “मिस्टर लेले’ मध्ये या जोडीमध्ये भूमी पेडणेकरचा रोल कसा असेल, हे लवकरच समजेल. पण बऱ्याच दिवसांनी कॉमेडी सिनेमा करायला मिळाल्यामुळे ती देखील खूशीत असेल.