मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कॅप्टन मिताली राज हिचा बायोपिक असलेला शाबाश मिट्ठूचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटात अभिनेत्री तापसी पन्नू ही मिताली राजच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी देखील तापसी पन्नूने विविध व्यक्तिरेखा साकारत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. आता तापसी मितालीची भूमिका करणार आहे.
शाबाश मिट्ठूचा ट्रेलर पाहून तापसी पन्नूच्या अभिनयाचे कौतुक सोशल मीडियावर अनेक चाहते करताना दिसत आहेत. हा ट्रेलर पाहिल्यावर एकूणच मितालीच्या लहानपणापासून ते मिताली भारतीय महिला क्रिकेट टीमची कॅप्टन होईपर्यंतचा प्रवास चित्रपटातून पाहायला मिळणार असल्याचे एकूण ट्रेलर पाहिल्यावर लक्षात येते. शिवाय चित्रपटात मितालीचा स्ट्रगल देखील पाहायला मिळणार आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर तुम्ही जर हा चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहत असाल तर हा चित्रपट १५ जुलै ला रिलीज होणार आहे. हा चित्रपट लोकांच्या कितपत पसंतीस उतरेल हा येणारा काळच सांगेल मात्र सध्या तरी शाबाश मिट्ठूचा ट्रेलर सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.