Women’s Asia Cup 2022 : नुकतीच युएई येथे पुरुषांची आशिया चषक स्पर्धा ( Men’s Asia Cup 2022 ) पार पडली. यामध्ये श्रीलंका ( Sri Lanka ) संघाने एकजुट आणि चिकाटीने उत्तम खेळ दाखवला. स्पर्धा सुरू होण्याअगोदर याच संघाला सर्वात कमी लेखले जात होते. सुरुवातीला तर तसेच घडले देखील होते. कारण स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तान संघाने श्रीलंकेला मोठ्या पराभवाचे तोंड दाखवले होते. यानंतर असे वाटत होते कि श्रीलंका ( Sri Lanka ) फक्त नावापुरतीच या स्पर्धेत उतरली आहे. मात्र यानंतर श्रीलंकन संघाने स्पर्धेत एकही सामना गमावला नाही आणि थेट स्पर्धेच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले.
भारत आणि पाकिस्तानला ( India and Pakistan ) या स्पर्धेचे प्रबळ दावेदार मानले जात असताना श्रीलंकन ( Sri Lanka ) संघाने या दोन्ही देशांचे चांगलेच गर्वहरण केले. भारताला एकदा तर पाकिस्तानला दोन वेळा श्रीलंकेविरुध्द पराभव पत्करावा लागला होता. यानंतर आता महिला आशिया चषकाचा ( Women’s Asia Cup 2022 ) देखील लवकरच बिगुल वाजणार आहे. यंदाची आशिया चषक स्पर्धा बांगलादेशात खेळवली जाणार आहे. ही स्पर्धा १ ऑक्टोबर ते १६ ऑक्टोबर दरम्यान खेळवली जाईल.
महिला आशिया चषक ( Women’s Asia Cup 2022 ) स्पर्धेत एकूण ७ संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये आत्तापर्यंत भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि मलेशिया या देशांनी आपले संघ जाहीर केले आहेत. स्पर्धेचे यजमानपद हे बांगलादेशकडे असणार आहे, मात्र त्यांनी अद्याप आपला संघ जाहीर केलेला नाही. दुसरीकडे भारतीय संघात काही बदल करण्यात आलेले आहेत. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय संघ या स्पर्धेत उतरणार आहे.
संघाची सध्याची कामगिरी पाहिल्यास भारतालाच स्पर्धेचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. त्याचबरोबर सलामीवीर स्मृती मंधाना हिला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. याशिवाय युवा फलंदाज रिचा घोषची यष्टिरक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. मात्र, यष्टीरक्षक यास्तिका भाटियाला या स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळालेले नाही. दीप्ती शर्माशिवाय शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज आणि सबिनेनी मेघना यांची देखील संघात निवड करण्यात आली आहे.
आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघ – हरमनप्रीत (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), दीप्ती शर्मा, शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, सबिनेनी मेघना, रिचा घोष (यष्टीरक्षक), स्नेह राणा, दयालन हेमलता, मेघना सिंग, रेणुका ठाकूर, पूजा वस्त्रकर, राजेश्वरी गायकवाड, राजेश्वरी गायकवाड. यादव, के.पी.नवगिरे, तानिया सपना, भाटिया, सिमरन दिल बहादूर.