आळंदी, – कोरेगाव भीमा नजिक पेरणेफाटा (ता. हवेली) येथे येत्या एक जानेवारी रोजी विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम होत आहे. येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी लाखो अनुयायी येणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे. अनुयायी यांची आणि अत्यावश्यक वाहने वगळता इतर वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. चाकण, म्हाळुंगे, दिघी-आळंदी, तळेगाव, भोसरी वाहतुक विभाग अंतर्गत येणाऱ्या व जाणाऱ्या परिवहन मंडळाच्या बसेस, जड, हलकी वाहने, माल वाहतूक टेम्पो, ट्रक वाहनांकरिता 31 डिसेंबर ते 1 जानेवरी रात्रीपर्यंत वाहतूकीत बदल करण्यात आला असून वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन पिंपरी चिंचवडचे वाहतूक शाखा पोलिस उपायुक्त बापू बांगर यांनी केले आहे.
वाहतूकीत बदल करण्यात आलेले मार्ग आणि पर्यायी मार्ग –
– विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी येणाऱ्या अनुयायींची वाहने वगळता चाकण ते शिक्रापूर व शिक्रापुर ते चाकण अशी दोन्ही बाजुकडील जाणाऱ्या व येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.
– सोलापूर रोडवरून आळंदी चाकण या भागात येणारी जड वाहने माल वाहतुक टेम्पे ट्रक ही वाहने हडपसर- मगरपट्टा-खराडी बायपास मार्गे विश्रांतवाडी येथून आळंदीकडे तसेच देहुफाटा चौकात डावीकडे वळुन पुढे पुणे नाशिक रोडवरून चाकण येथे जातील.
– मुंबई येथून अहमदनगरकडे जाणारी जड वाहने / माल वाहतूक (टेम्पो / ट्रक) ही वाहने वडगाव मावळ – एचपी चौक म्हाळुंगे- वासोली फाटा – बिरदवडी गाव – रोहकल फाटा – पुणे नाशिक रोड- खेड- मंचर – नारायणगाव, आळेफाटा मार्गे अहमदनगर येथे जातील.
– मुंबई येथून अहमदनगरकडे जाणारी जड वाहने / माल वाहतूक (टेम्पो / ट्रक) ही वाहने वडगाव मावळ – एचपी चौक म्हाळुंगे- वाघजाईनगर- बिरदवडी गाव – रोहकल फाटा – पुणे नाशिक रोड- खेड- मंचर – नारायणगाव- आळेफाटा मार्गे अहमदनगर येथे जातील.
– मुंबई येथुन अहमदनगर बाजुकडे जाणारी हलकी वाहने उदा. कार, जिप इ. वडगाव मावळ – चाकण चौक खेड- पाबळ – शिरुर मार्गे अहमदनगर येथे जातील.
– आळंदी- शेल पिंपळगाव- बहुळ- साबळेवाडी दोन्ही बाजुकडील जाणारी व येणारी सार्वजनिक/खाजगी प्रवासी वाहतूक पुर्ण पणे बंदी करण्यात येत आहे. (अनुयायी यांच्या वाहनांखेरीज )
– आळंदी – मरकळ – लोणीकंद कडे जाणारी व येणारी सार्वजनिक / खाजगी प्रवासी वाहतूक पुर्ण
पणे बंदी करण्यात येत आहे. ( मरकळ गाव, इंद्रायणी नदी पुलावर ९ फुट उंचीवर लोखंडी ओव्हरहेड बॅरिकेट लावले असल्याने त्यापेक्षा जास्त उंचीची वाहने तेथुन जावु शकणार नाहीत. त्यापेक्षा कमी उंचीच्या फक्त अनुयायी यांच्या वाहनांना प्रवेश दिला जाईल.)
– मुंबईकडुन देहुरोड येथे जुन्या पुणे मुंबई हायवेने येणारी वाहतूक सेंट्रल चौकातुन निगडी – पिंपरी चिंचवडकडे न जाता सदरची वाहतूक ही सेंट्रल चौकाकडुन मुंबई बेंगलोर हायवेने सरळ वाकडनाका- चांदणी चौकातुन इच्छित स्थळी जावु शकतील. (अनुयायी यांच्या वाहनांना प्रवेश दिला जाईल.)
– मुंबई कडुन एक्सप्रेस हायवेने पुणे कडे जाणारी वाहने उर्से टोलनाका येथुन मुंबई बेंगलोर हायवेने (निगडी मुकाई चौकाकडे न जाता ) सरळ वाकड नाका व राधा चौक येथुन पुणेकडे जावु शकतील. (अनुयायी यांच्या वाहनांना प्रवेश दिला जाईल.)
20 लाख अनुयायी येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची तयारी –
विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी सुमारे वीस लाखांहून अधिक अनुयायी येणार असल्याने त्या दृष्टीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. 31 डिसेंबर आणि एक जानेवारीला सुमारे एक हजार बसेस, 110 एकरवर वाहन तळ आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सुमारे आठ हजार पोलिस कर्मचारी तैनात असणार आहेत, अशी माहिती जिल्हाधकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.