नाताळानिमित्त कॅम्प परिसरातील वाहतुकीत बदल

पुणे – नाताळाच्या दिवशी कॅम्पमध्ये नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येतात. त्यामुळे या परिसरात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दि. 25 रोजी वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. महात्मा गांधी रस्त्यासह (एम.जी. रोड) या परिसरातील काही रस्ते बंद ठेवण्यात येणार असून, वाहतूक पर्यायी रस्त्याने वळविण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्‍त प्रसाद अक्कानवरू यांनी दिली.

याप्रमाणे वळविण्यात येणार वाहतूक
गोळीबार मैदान चौकातून एम.जी. रोड आणि पुलगेटकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाय जंक्‍शनवरून एम.जी. रोडकडे येणारी वाहतूक 15 ऑगस्ट चौक येथे थांबविण्यात येणार असून, कुरेशी मस्जिद, सुजाता मस्तानीमार्गे वळविण्यात येणार आहे. इस्कॉन मंदिर चौकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अरोरा टॉवरकडे जाणारी वाहतूक एसबीआय हाऊस चौकाकडे वळविण्यात येणार आहे.

व्होल्गा चौकातून महंमद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक ईस्ट स्ट्रीटमार्गे इंदिरा गांधी चौकाकडे वळविण्यात येणार आहे. इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक लष्कर पोलीस ठाणे चौकाकडे वळविण्यात येईल. सरबतवाला चौकाकडून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक ताबूत स्ट्रीटमार्गे वळविण्यात येणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.