नवी दिल्ली – टोयोटा किर्लोस्कर मोटार या कंपनीने आपल्या कर्नाटकमधील बिदाडी येथील कारखान्यातील उत्पादन 22 जुलैपर्यंत थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. या कारखान्यात गेल्या काही दिवसात बऱ्याच कामगारांना संसर्ग झाल्यामुळे आणि कर्नाटक राज्यात लॉकडाऊन सुरू करण्यात आल्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
सोमवारी या कंपनीतील चार कामगारांना करोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले होते. या अगोदर 20 कर्मचाऱ्यावर उपचार करण्यात आले आहेत. केवळ कामगारच नाही तर व्यवस्थापन, डीलर इत्यादींनाही संसर्ग होऊ नये म्हणून कंपनीने खबरदारीच्या सूचना केलेल्या आहेत, असे कंपनीच्या व्यवस्थापनाने
म्हटले आहे.