नवी दिल्ली : देशात सध्या टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. मागणी जास्त आणि पुरवठा कमी झाल्यामुळे दरात मोठी वाढ होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. देशाची राजधानी दिल्लीत देखील टोमॅटोच्या दराने गगनभरारी घेतली आहे. दिल्लीत प्रतिकिलो टोमॅटोसाठी 200 रुपये एवढी किंमत मोजावी लागत आहे.
दिल्लीतील मदर डेअरीने सफाल रिटेल आउटलेटवर टोमॅटोची 259 रुपये प्रतिकिलो दराने विक्री केली. प्रमुख टोमॅटो उत्पादक राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळं पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे टोमॅटोचे भाव एक महिन्याहून अधिक काळ झालं वाढले आहेत. सध्या देशभरात टोमॅटो दरात मोठी वाढ झाली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी टोमॅटो आहे, त्यांना मोठा फायदा होत आहे.
सध्या ज्या प्रमाणात टोमॅटोला मागणी आहे ,या प्रमाणात पुरवठा होताना दिसत नाही. परिणामी टोमॅटोचे दर मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. प्रतिकिलो टोमॅटोसाठी 170 ते 200 रुपये द्यावे लागत आहेत. राष्ट्रीय राजधानीतील किरकोळ किंमती अलीकडेच खाली येऊ लागल्या होत्या. परंतू कमी पुरवठ्यामुळे पुन्हा टोमॅटोच्या किंमती वाढल्या आहेत. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, टोमॅटोची किरकोळ किंमत बुधवारी 203 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचली, तर मदर डेअरीच्या सफाल रिटेल आउटलेटवर त्याची किंमत 259 रुपये प्रतिकिलो होती.
गेल्या दोन महिन्यांपासून खराब हवामानामुळं टोमॅटोच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असल्याची माहिती मदर डेअरीच्या प्रवक्त्याने दिली आहे. गेल्या दोन दिवसांत आझादपूर मंडईत टोमॅटोची आवक लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. त्यामुळं घाऊक दरात मोठी वाढ झाली आहे. आशियातील सर्वात मोठ्या फळ आणि भाजीपाला घाऊक बाजार आझादपूरमध्ये काल टोमॅटोचा घाऊक दर दर्जानुसार 170-220 रुपये प्रति किलो होता. ली.