हॉलीवूड सुपरस्टार टॉम क्रूझ हा आपल्या आगमी “मिशन इम्पॉसिबल-7′ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत टॉम क्रूझ चालत्या ट्रेनवर स्टंट सीन शूट करताना दिसत आहे.
यात टॉम क्रूझ हा दिग्दर्शक ख्रिस्टोफर मैकक्वेरी यांच्या सोबत एका ट्रेनवर असल्याचे दिसत आहे. टॉम क्रूझ आपल्या संपूर्ण क्रूसोबत एका वेगवान धावणाऱ्या रेल्वेवर स्टंट करताना दिसतोय. यात त्याचा जबरदस्त स्टंटपाहून चाहते आश्चर्यचकित होत आहेत. हा स्टंट नॉर्वेत शूट करण्यात आला आहे. ख्रिस्टोफर मैकक्वेरीने या ऍक्शन सीक्वेंसचा एक फोटो शेअर करत सांगितले की, नॉर्वेचे शूटिंग पूर्ण करून आता रोमला चाललो आहे.
करोना व्हायरसमुळे या चित्रपटाचे शूटिंग लांबल्याने आता हा चित्रपट 19 नोव्हेंबर 2021मध्ये रिलीज होणार आहे. यापुर्वी तो जुलै 2021ला रिलीज होणार होता. विशेष म्हणजे “मिशन इम्पॉसिबल 8’चीही तयारी करत असून तो नोव्हेंबर 2022मध्ये प्रदर्शित होणार आहे.