टोकियो – महिला टेनिसच्या दुहेरी गटात भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झा हिला अंकिता रैनासह खेळताना पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात या दोघींनी पहिला सेट 6-0 असा जिंकून थाटात प्रारंभ केला होता.
मात्र, त्यानंतर युक्रेनच्या ल्युडमीला विक्टिरिवना किचेनोक व नाडिया विक्टोरिवना किचेनोक या जुळ्या बहिणींनी अफलातून पुनरागमन करताना सानिया व अंकिता यांना पुढील दोन्ही सेटमध्ये संधीच दिली नाही.
त्यांनी दुसरा सेट 7-6 असा जिंकला व बरोबरी केली. निर्णायक सेटमध्ये त्यांनी सानिया-अंकिताला 10-8 असे पराभूत केले.