आजचे भविष्य (शनिवार, 20 मार्च,2021)

मेष : स्पर्धकांच्या पुढे जाण्याचा विचार तुमचा असेल. नवीन कामे ओळखीतून मिळतील. प्रवास घडेल.

वृषभ : नोकरीत कामानिमित्ताने जादा अधिकार मिळतील. वरिष्ठ व सहकारी कामात मदत करतील.

मिथुन : घरात वातावरण आनंदी व उत्साही राहील. नवीन वाहन, जागा, खरेदीचे मनसुबे ठरतील.

कर्क : कामात महिला पुढाकार घेतील. कधी शक्ती तर कधी युक्तीने कामे हातावेगळी कराल.

सिंह : व्यवसायात कामात आवश्‍यक व योग्य व्यक्तिंकडून सहकार्य मिळाल्याने तुमचा कामाचा हुरूप वाढेल.

कन्या : नोकरीत परदेशगमनाची संधी चालून येईल. लाभ घ्या. वरिष्ठ न मागता कामात सवलती देतील.

तूळ : घरात तरूणांनी सतर्क रहावे. आप्तेष्ट व नातेवाईकांच्या भेटीगाठींचे योग येतील. दगदग धावपळ कमी करावी.

वृश्‍चिक : भरपूर उत्साह देणारे ग्रहमान आहे. स्वतःचे कलागुण दाखवण्याची संधी मिळेल. घरात शुभकार्ये ठरतील.

धनु : व्यवसायात तुमच्या मताला मान मिळेल. त्यामुळे प्रगतीचा वेग राखता येईल.

मकर : विचार व कृती यांची योग्य सांगड घालाल. कामे पूर्ण करता येतील. भांडवलाची तरतूद होईल.

कुंभ : वरिष्ठ जादा अधिकार देतील त्याचा गैरफायदा घेऊ नका. प्रवास घडेल. मित्रमैत्रीणी समवेत वेळ मजेत जाईल.

मीन : नोकरीत कामातून आर्थिक लाभाचा फायदा मिळेल. व्यवसायात योजून घेतलेल्या निर्णयाचा लाभ होईल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.