नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिलपर्यंत देशात लॉकडाऊन करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर सध्या देशात लॉकडाऊन ५.० सुरु आहे. देशात ट्रेन, विमानसेवा पूर्ण क्षमतेने सुरु झाली नसली, तरी मेट्रो, रस्त्यावरील वाहतूक, हॉटेल, सिनेमा हॉल सुरु झाले आहेत.
Prime Minister Narendra Modi will be sharing a message for citizens at 6 PM today. pic.twitter.com/2zq2JfDZGU
— ANI (@ANI) October 20, 2020
कोरोनासंदर्भात पंतप्रधान मोदी वेळोवेळी देशवासियांना संबोधित करत असतात. आज देखील ते संध्याकाळी सहा वाजता व्हिडीओ संदेश प्रसारित करणार आहेत.
लॉकडाऊनमुळे ढासळलेली अर्थव्यवस्था आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. पण अजूनही अर्थव्यवस्थेची गाडी पूर्णपणे रुळावर आलेली नाही. सणवाराच्या या काळात मोठी उलाढाल अपेक्षित आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने काय घोषणा करणार? नवीन पॅकेज जाहीर करणार का? कर्जदारांना दिलासा मिळणार का? या पार्श्वभूमीवर मोदी आता नेमकी काय भूमिका घेणार? याकडे देशाचे लक्ष लागले आहे.