पुण्यात आज ‘राज’गर्जना

सिंहगड रस्त्यावरील शिंदे मैदानात सभा

पुणे – पुणे लोकसभा मतदारसंघासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार नसला तरी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पुण्यात जाहीर सभा होणार आहे. बारामती आणि पुणे लोकसभा मतदारसंघाच्या सिमेवर सिंहगड रस्त्यावरील खडकवासला कालव्याच्या बाजूच्या शिंदे मैदानात ही सभा होणार आहे. त्यामुळे पुण्याच्या प्रश्‍नांबाबत राज ठाकरे सत्ताधारी भाजपचा काय समाचार घेणार, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, मनसेने अजून कोणत्याही राजकीय पक्षाला जाहीर पाठिंबा दिलेला नसला, तरी पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांकडून कॉंग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांचा प्रचार सुरू करण्यात आला आहे.

ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात नांदेड, सोलापूर, इचलरंजी, साताऱ्यात जाहीर सभा घेतल्या आहेत. त्यानंतर पाचवी सभा पुण्यात होत आहे. ठाकरे यांनी या पूर्वीच्या आपल्या चारही सभांमध्ये केंद्रशासन तसेच राज्यशासनाच्या कारभाराची चिरफाड केली आहे. तसेच ज्या शहरात सभा होते त्या शहराच्या समस्यांही आपल्या भाषणात मांडलेल्या आहेत. त्यामुळे ठाकरे पुण्यात काय बोलणार, याकडे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.