पुन्हा निर्मितीच्या क्षेत्राकडे…

हॉटस्टारवरील “स्पेशल ऍप्स’ या नीरज पांडेच्या वेबसीरीजमधील अभिनयाबाबत अभिनेता विनय पाठक याच्या अभिनयाची सध्या अनेकांकडून प्रशंसा केली जात आहे. छोटा पडदा असो वा चित्रपट, विनयने आपल्या अभिनयाची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. “स्पेशल ऍप्स’मध्येही केके मेनन, दिव्या दत्ता आदींची उपस्थिती असतानाही विनयने आपला ठसा उमटवला आहे.

या वेबसिरीजमध्ये विनय अब्बास नामक क्राईम ब्रॅंचच्या एका पोलीस अधिकाऱ्याची व्यक्‍तिरेखा साकारली आहे. विनयचा एक चांगला गुण म्हणजे तो आपल्या प्रशंसेचे श्रेय स्वतःकडे कधीच घेत नाही. तो नेहमी याबद्दल दिग्दर्शकाला धन्यवाद देताना दिसतो. आताही विनय म्हणतो की, नीरज पांडेसारखे दिग्दर्शक असतील तर कोणाही कलाकारातील अभिनयाला बहर येतो.

विनयने एमबीएचे शिक्षण अर्धवट सोडून नाट्यशिक्षणाकडे मोर्चा वळवला. न्यूयॉर्कमध्ये एमबीए शिक्षणासाठी गेलेला असताना विनयने आपल्यातील पॅशन अभिनय ही असल्याचे लक्षात घेऊन अभिनयाच्या शिक्षणाकडे जाण्याचा निर्णय घेतला. जवळपास सात-आठ वर्षे थिएटर करून तो मुंबईला परतला. त्यावेळी त्याच्याकडे काहीही काम नव्हते.

2007 मध्ये आलेल्या “भेजा फ्राय’ चित्रपटाने विनयला ओळख मिळवून दिली आणि त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. आता विनयला पुन्हा निर्मितीच्या क्षेत्राकडे जायचे आहे. लॉकडाऊनच्या काळात तो आपल्या आगामी चित्रपटाची योजना आखत आहे. त्याच्या चित्रपटाची स्क्रिप्ट अंतिम टप्प्यात आल्याचे सांगितले जाते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.