न्यूयॉर्क : करोनाने सर्वाधिक प्रभावित अमेरिका झाली आहे. इथे आतापर्यंत ६३ हजार नागरिकांनी प्राण गमावले असून, १० लाखांहून अधिक लोकांना या विषाणूचा संसर्ग झाला आहे. जगभरातील कुठल्याही देशातील ही सर्वाधिक संख्या आहे. अमेरिकेसाठी दिलासादाक बाब म्हणजे आतापर्यंत एक लाख ५५ हजार जणांनी या महामारीचा पराभव केला आहे.
वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, ३० एप्रिल रोजी दोन हजार दोनशे लोकांचा बळी गेला आहे. अमेरिकेतील न्यूयार्क शहरात करोनामुळे सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आहे. न्यूयार्कमध्ये आतापर्यंत २३ हजार जणांचा बळी गेला आहे. तर तीन लांखांना या महामारीनं ग्रासलं आहे. न्यूयार्कपाठोपाठ न्यूजर्सीमध्ये सात हजारांपेक्षा जास्त जणांचा बळी गेला आहे.
२० वर्षे चाललेल्या व्हिएतनाम युद्धात ५८ हजार २२० अमेरिकी सैनिक मरण पावले होते. तो आकडा अमेरिकेने बुधवारी पार केला. मात्र, १९१८ सालच्या फ्लूच्या महासाथीत अमेरिकेतील ६ लाख ७५ हजार लोक मृत्युमुखी पडले होते, त्यापेक्षा हा आकडा बराच कमी आहे.