इंदापूर- इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कडून विधानसभेसाठी अर्ज दाखल केला. मात्र इतिहासात पहिल्यांदाच राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे खुद्द आमदार भरणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थित होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष प्रदीप गारटकर मंगल सिद्धी आणि परिवाराचे प्रमुख राजेंद्र तांबिले उपस्थित होते. तब्बल पंचवीस हजार मतदारांचे शक्तीप्रदर्शन करत भरणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.