टायगर श्रॉफला घेऊन “रॅम्बो’ बनवण्याची घोषणा निर्माता दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदनी मोठ्या जोरात केली होती. मात्र पुढे त्या सिनेमाची अजिबात चर्चा झाली नाही. आता या सिनेमाचे प्रॉडक्शन होईल की नाही, याचीही शंका वाटायला लागली आहे. कारण या सिनेमाबाबत इतक्या अफवा पसरल्या होत्या, त्या निस्तरण्यापेक्षा सिनेमा न करणेच परवडू शकते. टायगर श्रॉफ बरोबर “वॉर’ करत असतानाच सिद्धार्थ आनंदला “रॅम्बो’ची थीम सुचली होती.
टायगरची ऍक्शन वरची जबरदस्त पकड आणि लुक दोन्ही रॅम्बोला साजेशी असल्याने त्याने हा विषय रेटला होता. मूळ रॅम्बो सिल्व्हरस्टन स्टॅलोननीही रॅम्बोच्या हिंदी रोलसाठी टायगर श्रॉफच्या लुकला पसंती दिली होती. मात्र त्यानंतर “रॅम्बो’ची चर्चाच बंद झाली. “रॅम्बो’ हा मेगा ऍक्शन फिल्म असल्यामुळे त्याच्या प्रॉडक्शनसाठी खूप मेहनत करावी लागणार.
म्हणूनही त्याबाबत काही हालचाली झाल्या नसाव्या असा अंदाज होता. दरम्यान “वॉर’ पूर्णही झाला. आता टायगरला घेऊन “खलनायक 2’ची तयारीही सुरू झाली. पण “रॅम्बो’चा पत्ताच नाही. आता तर टायगरला नवीन नवीन प्रोजेक्ट मिळायला सुरुवात झाली. पण कोणीच “रॅम्बो’च्या प्रगतीबाबत काहीच बोलत नाही आहे. बहुतेक आता हा प्रोजेक्ट गुंडाळला गेला असेच म्हणावे लागेल.