गोंदियात रेल्वेच्या धडकेने वाघाचा मृत्यू

नागपुर – गोंदिया जिल्ह्यात रेल्वेची धडक बसून एका वाघाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीला आल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले. गोंगली आणि हिरडामली रेल्वेस्थानकांच्या दरम्यान ही घडना घडली.

रेल्वे रूळानजिक वाघ मरून पडल्याची माहिती हिरडामली रेल्वे स्थानकाच्या स्टेशन मास्तरला समजली त्याने जागेवर जाऊन खातरजमा केली आणि त्यांनी ही माहिती वन अधिकाऱ्यांना कळवली. 3 मार्च रोजी याच जिल्हतील गंगाजहरी रेल्वे स्थानकाजवळ दोन अस्वले रेल्वेची धडक लागून ठार झाल्याची घटना घडली होती.

आज तेथे जो वाघ ठार झाला आहे तो नेमका किती वर्षांच होता वगैरे माहिती मात्र अजून उपलब्ध झालेली नाहीे. या परिसरातील वन्य शापदांना रेल्वेपासून अनेक वेळा धोका उत्पन्न होत असल्याचे लक्षात आले आहे. मात्र त्यावर नेमकी उपाययोजना करणे हे वन अधिकाऱ्यांच्या आवाक्‍याबाहेरचे आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.