गोंदिया – गोंदियातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे कार्यरत असलेल्या एका डॉक्टरने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भूषण वाढोळकर (24) रा. चांदुर रेल्वे, जिल्हा अमरावती) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टराचे नाव आहे.
वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये इंटर्नशिप करणाऱ्या डॉक्टरने आत्महत्या केली आहे. भूषण याने 2018 मध्ये गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश केला होता. तर यावर्षी त्याचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाले होते. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.