वॉशिंग्टन – अमेरिकेने टिकटॉकला ही कंपनी अमेरिकन संस्थेला विकण्याची अट घातली आहे. येत्या पंधरा सप्टेंबरच्या आत टिकटॉक या सोशल मीडिया कंपनीने आपली मालकी बदलावी, अन्यथा अमेरिकेतून गाशा गुंडाळावा. त्यांना यात कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
गेल्याच महिन्यात ट्रम्प प्रशासनाने त्यांना अशी मुदत दिली आहे. त्यात आता वाढ होण्याची शक्यता नाही, असेही त्यांनी नमूद केले.
टिकटॉक ही चिनी कंपनी आहे. ती कंपनी अमेरिकन कंपनीला विकावी, अन्यथा ती येथून काढून घ्यावी या भूमिकेचे अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर स्वागत केले गेले आहे.
टिकटॉक कंपनीवर भारतासह अनेक देशांनी बंदी घातली आहे. भारताच्या निर्णयानंतर अमेरिकेनेही असाच निर्णय घेतला आहे.