कोल्हापूर : कोल्हापूरात बर्निंग कार चा थरार पाहायला मिळाला आहे. कोल्हापूर- गारगोटी मार्गावर स्कोडा रॅपिड कारने अचानक पेट घेतलाय. चालकाचा ताबा सुटून गाडी रस्त्याच्या कडेला धडकल्यानंतर लागलेल्या आगीत गाडी पूर्णतः जळून खाक झालीय. तब्बल अर्धा तासाच्या प्रयत्ना नंतर अग्निशमन दलाच्या सहाय्याने आग विझवली आहे. रात्री उशिरा ही घटना घडली आहे.