तीन वर्षे अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधमावर गुन्हा

यवत – दौंड तालुक्‍यातील वाखारी गावच्या हद्दीतील एका अल्पवयीन मुलीचे मोबाइलमध्ये काढलेले फोटो व्हायरल करण्याची व जीवे मारण्याची धमकी देऊन त्यानंतर वारंवार अत्याचार करणाऱ्या नराधम आरोपी विरोधात यवत पोलीस ठाण्यात बलात्काराचा व बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार मंगळवारी (दि. 16) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 2017 ते जून 2019 पर्यंत सुरू होता.

मंगेश अंकुश ताबांरे (सध्या रा. यवत, ता. दौंड, मूळ रा. खालापूरी) असे नराधम आरोपीचे नाव आहे. तर या आरोपीला मदत करणारा विकास चव्हाण (रा. पाटस, ता. दौंड) याच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची अधिक माहिती अशी आहे की, पीडित अल्पवयीन मुलगी एकटीच घरी असताना आरोपी तिच्या घरी गेला. मुलीचे मोबाइलमध्ये काढलेले फोटो व्हायरल करण्यासह जीवे मारण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केला. जीवे मारण्याच्या भीतीपोटी या मुलीने घडलेला प्रकार घरच्यांना सांगितला नाही. त्यानंतर आरोपी एवढ्यावर न थांबता मुलीची बदनामी होण्याच्या उद्देशाने आरोपीने त्याचे व मुलीचे एकत्र असलेले फोटोचे व्हिडीओ तसेच फोटो व्हॉट्‌सऍप नंबरच्या स्टेटसला तसेच डीपीला ठेवू लागला. त्यानंतर वेगवेगळ्या नंबरवरून मुलीच्या मामाला फोन करून आरोपीचा मित्र बोलत आहे, असे म्हणून धमकी देत होता. हा सगळा प्रकार असह्य झाल्याने पीडित मुलीने यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.