अहमदाबाद – खाद्यपदार्थ तयार करण्याच्या अहमदाबाद येथील फॅक्टरीत निर्माण झालेल्या धुरामुळे गुदमरून तेथील तीन कामगार मरण पावल्याचा प्रकार आज तेथे उघडकीला आला आहे. ही फॅक्टरी घाटलोदिया येथील के के नगरमधील एका शाळेजवळ आहे.
या फॅक्टरीचे मेन गेट आज सकाळी बंद आढळले. तेथे काही तरी विपरीत घडलेले असावे, असा संशय आल्याने स्थानिक नागरिकांनी पोलिसांना सावध केले. त्यावेळी पोलिसांनी मेन गेट उघडून फॅक्टरीत प्रवेश केला, त्यावेळी त्यांना तेथे तीन जण मरण पावल्याचे आढळून आले.
अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, गॅस लीकेजमुळे किंवा वायुगळतीमुळे हा प्रकार घडलेला नाही. धूर कोंडला गेल्याने त्याचा त्रास होऊन हे कामगार दगावले असण्याची शक्यता आहे. हे कामगार रात्रीच्यावेळी फॅक्टरीच्या आवारातच झोपत असत, अशी माहितीही उघड झाली आहे. इब्राहिम, अस्लम आणि हसन अशी मरण पावलेल्या तीन जणांची नावे आहेत.