श्रीनगर – जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात आज पहाटे दहशतवादी आणि सूरक्षा दलांमध्ये चकमक झाली. यामध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश मिळाले आहे. हे दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीनचे असून जहांगीर रफीक वानी, राजा उमर मकबूल भट आणि उझेर अहमद भट अशी त्यांची नावे आहेत.
Jammu & Kashmir Police: Three terrorists killed in an encounter with police in Tral. Further details shall follow. pic.twitter.com/2y04yVPedv
— ANI (@ANI) February 18, 2020
त्रालमधील एका गावात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी या परिसराला घेराव घालत शोधमोहिम सुरु केली. यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला सुरक्षा दलाच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर देत दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.