बीआरटीचे जाळे उभारणार

वाहतूक व्यवस्थेसाठी 416 कोटींची तरतूद : विविध पूल, रस्ते, “स्काय वॉक’चे नियोजन

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहराचा दिवसेंदिवस विस्तार होत आहे. उद्योग-धंद्यांच्या वाढीमुळे शहरामध्ये लोकसंख्या वाढली आहे. वाढणाऱ्या लोकसंख्येचा विचार करुन नागरिकांना सक्षम सार्वाजनिक वाहतुकीचा पर्याय देण्यासाठी महापालिकेच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी शहरामध्ये बीआरटीचे जाळे उभारले जाणार आहे. या कामासाठी यंदाच्या अंदाजपत्रकामध्ये 416 कोटी 54 लाखांची भरीव तरतूद केली आहे.

महापालिकेच्या वतीने बीआरटीचे जाळे उभारण्यात येणार आहे. त्यासाठी विशेष लेखाशीर्षाखाली 205 कोटी 72 लाख तर महसुली कामांसाठी 25 कोटींची तरतूद अंदाजपत्रकामध्ये करण्यात आली आहे. याद्वारे बीआरटीएस अंतर्गत विविध रस्ते, पूल, स्काय वॉक, ग्रेड सेपरेटर व सायकल ट्रॅक बांधण्यात येणार आहे.

भक्ती शक्ती चौक येथे ग्रेड सेपरेटर बांधण्यासाठी 4 कोटी तरतूद करण्यात आली आहे. बोपखेल ते आळंदी रस्ता करण्यासाठी 1 कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. तसेच भक्ती शक्ती चौक ते मुकाई चौक किवळे या मार्गासाठी 10 कोटी 91 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. बोपखेल येथे मुळा नदीवरील पूल बांधण्याचे काम सुरु आहे. या पूलामुळे बोपखेल मधील नागरिकांना खडकी बाजार मुंबई पुणे रस्ता या मार्गावरील शैक्षणिक संस्था व व्यापारी पेठांमध्ये जाण्यासाठी पर्याय उपलब्ध होणार आहे. या रस्त्यासाठी 24 कोटी 20 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच भक्ती शक्ती चौक ते मुकाई चौक किवळे या संपुर्ण रस्त्यासाठी 10 कोटी 91 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

भक्ती शक्ती चौक ते रेल्वे लाइनपर्यंतेच काम पूर्ण झाले आहे. रेल्वे लाइन उड्डाणपूलापासून ते किवळे मुकाई चौकापर्यंतच्या रस्त्याचे काम सप्टेंबर 2020 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजनात आहे. या रस्त्यावरील निसर्ग दर्शन सोसायटी येथे रेल्वेवरील उड्डाणपूलासाठी 4 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या रस्त्यामुळे भोसरी, आकुर्डी, निगडी, चिंचवड व तळवडे या भागात राहणाऱ्या नागरिकांना पुणे मुंबई एक्‍सप्रेस रस्त्याकडे जाण्याचा जवळचा मार्ग उपलब्ध होणार आहे. या मार्गावर निगडी भक्ती शक्ती चौक ते मुकाई चौक किवळे असा बीआरटी मार्ग चालू करण्यात येणार आहे. निगडी व मुकाई चौक येथे बीआरटी बस सेवेचे टर्मिनल असल्याने त्याचा फायदा या कॉरीडॉरला होणार आहे. एचसीएमटीआर रस्त्याचा विकास करण्यासाठी 50 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त इतर 12 कामांसाठी 416 कोटी 56 लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

“बीआरटी’ अंतर्गत कामे व निधी
कोकणे चौक ते काळेवाडी फाटा द्रुतगती मार्ग : 7 कोटी 60 लाख
नाशिक फाटा ते वाकड बीआरटीएस रस्त्यावर रहाटणी येथे दोन समांतर पूल : 13 कोटी 83 लाख
नाशिक फाटा ते वाकड रस्त्यावर सुदर्शन चौक, ग्रेड सेपरेटर : 13 कोटी 83 लाख
गोविंद यशदा चौक, पिंपळे सौदागर येथील अंडरपास : 10 लाख
प्रायोगिक तत्वार पाच रस्त्यांवर 6.80 किमीचे रस्ते विकसित करणे : 16 कोटी 39 लाख
सायकल मार्ग : 15 कोटी
एम्पायर एस्टेट पुलासाठी लिंक रोड येथे लूप बांधणे : 3 कोटी 45 लाख
नाशिक फाटा ते वाकड ते हिंजवडी फ्री वे 5 कोटी
सांगवी, बोपडीत मुळा नदीवर पूल बांधणे : 1 कोटी वाल्हेकरवाडी ते ताथवडेपर्यंत रस्ता आणि पवना नदीवरील पूल : 30 कोटी

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.