राज्यात वीज कोसळून तिघांचा मृत्यू तर चार जण गंभीर जखमी

मुंबई : दोन आठवड्याच्या विश्रातीनंतर पावसाने राज्यात पुन्हा एन्ट्री केली आहे. शनिवारी अहमदनगर,बीड, सातारा, सांगली, भिवंडीसह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. दरम्यान, या पावसात वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. धुळ्यात दोन बालकांचा तर भिवंडीत एका महिलेचा वीज पडून मृत्यू झाला आहे.

धुळ्यातील पाडळदे गावात झाडावर वीज कोसळली परंतु, झाडाखाली असणाऱ्या एका 14 वर्षाच्या पंकज राठोड मुलाचा यात मृत्यू झाला तर त्याच्यासोबतचे आणखी दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. तर याच घटनेत एका म्हशीचादेखील मृत्यू झाला आहे. तर तिकडे भिवंडीत एका महिलेचा शेतात काम करत असताना मृत्यू झाला. प्रमिला वाघे असे मृत महिलेचे नाव आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.