कोल्हापूर /प्रतिनिधी : सम्राट चौक येथील रेड्याच्या टकरीजवळ तलवार आणि चाकू घेवून फिरणाऱ्या तिघांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. हसन रफिक शेख(वय.२५ रा. यादवनगर) सौरभ दीपक जाधव(वय.१९ रा. कनाननगर) आणि प्रीतम सर्जेराव चव्हाण (वय. २० रा. राजारामपुरी १४ वि गल्ली)अशी त्यांची नावे आहेत. सोमवारी रात्री उशिरा ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्री राजारामपुरी पोलीस सम्राट चौक येथील रेड्याच्या टकरी परिसरात गस्त घालत होते. दरम्यान दुचाकीवरून जाणाऱ्या तिघांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, संशयित पळून जाण्याच्या प्रयत्नात होते.
पोलिसांनी पाठलाग करून तिघांना ताब्यात घेतले. तिघांची झडती घेतली असता संशयित सौरभ जाधव यांच्या कमरेला चाकू मिळून आला. तर हसन शेखकडे तलवार मिळून आली.त्यानुसार पोलिसांनी हसन शेख, सौरभ जाधव आणि प्रीतम चव्हाण यांना अटक केली. त्यांच्याकडून राजारामपुरी पोलिसांनी तलवार,चाकू आणि मोटारसायकल असा एकूण ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अधिक तपास सुरू आहे.