मोरगाव -बारामती रस्त्यावर फोंडवाडा येथील घटना
बारामती (मोरगाव) : मोरगाव – बारामती या जिल्हा मार्ग क्रमांक 65 वर काऱ्हाटी नजीक फोंडवाडा येथे चारचाकी गाडीने दुचाकी वरील दोन व्यक्ती व एक पायी चालणाऱ्या व्यक्तीस जोरदार ठोस दिली आहे. या भीषण झालेल्या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असल्याची भिषण घटना आज घडली आहे .
याबाबत सविस्तर वृत्त असे की स्कुटी या दुचाकीवरुन कऱ्हावाघज येथील राऊत कुटुंबातील आई व मुलगा असे दोन जण मोरगाव- बारामती रस्त्याने कऱ्हावागज येथे चालले होते . तर दशरथ पिसाळ वय ६२ वर्षे याच रस्त्याच्या बाजुने फोंडवाडा येथील पेट्रोल पंपाकडे जात असताना त्याच दरम्यान बारामती बाजुने वेगवान चारचाकी गाडी आली . या गाडीने तीघांना जोरदार ठोस दिली . यामध्ये तीन जण जागीच मृत्यू पावले आहेत. वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी सदर ठिकाणी दाखल झाले असून घटनेचा पंचनामा त्यांनी नोंद करुन पुढील कार्यवाही सुरु आहे .