मुंबई – सैफ अली खान आणि करिना कपूर हे बॉलीवूडमधील प्रसिद्ध कपल आहे. चाहत्यांना या जोडीसह त्यांची मुले काय करतात यामध्ये देखील जास्त रस असतो. अनेकदा मीडियाकर्मी तर तैमूर आणि त्याच्या भावाचे फोटो काढण्यासाठी गोंधळ करताना दिसून येतात. यामुळे कित्येकदा सैफ करिनाला त्रासही सहन करावा लागतो.चाहत्यांना देखील तैमूर आणि त्याच्या कुटुंबाबतची सर्व माहिती वाचायला आवडत असते. अनेकदा सैफ करिना विदेशात सुट्ट्या घालवताना देखील दिसून येतात. विदेशातील सुट्ट्यांबाबत आता सैफने स्वतः स्पष्टीकरण दिले आहे.
एका मीडिया हाऊसला दिलेल्या मुलाखतीत सैफने त्यांच्या विदेशातील हॉलिडेजबाबत खुलासा केला आहे. सैफ म्हणतो माझ्याप्रमाणे स्टार कीड्सकडे देखील मीडिया मोठ्या प्रमाणात लक्ष देऊन असतात. तैमूर काय करतो.कोणत्या शाळेत जातो.त्याच्या आवडीनिवडी याबाबत मीडियाचे अटेंशन अनेकदा अधिक प्रमाणात असते. त्यामुळे तैमूरला मिळणाऱ्या मीडिया अटेंशनमुळे कधी कधी आमची चिडचिड होते असं सैफ सांगतो. या सर्व कारणामुळे मी माझ्या कुटूंबाला घेऊन विदेशात सुट्टीवर जातो तिथं तैमूरला मुक्तपणे वावरत येते असं स्पष्टीकरण सैफ अली खानने यावेळी दिले.
यापूर्वी तैमूरलं नेटकऱ्यांनी ट्रोल केले होते. सैफ सांगतो तो फक्त ५ वर्षांचा आहे त्याला ट्रोलिंग म्हणजे काय हे ही माहिती नाही. अशावेळी काळजी घेणं आमची जबाबदारी आहे. तैमूरचे फोटो किंवा त्याच्या भावाचे फोटो असोत चाहते त्यांच्यावर खूप प्रेम करतात म्हणूनच त्यांच्याबाबतची प्रत्येक माहिती मीडियाला हवी असते.