मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया तिच्या चित्रपटांसोबतच तिच्या सुंदर फोटोंमुळे देखील चर्चेत असते. तमन्ना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.आपल्या चित्रपटांच्या माहितीसह ती अनेकदा आपला स्टायलिश लूक चाहत्यांसाठी शेअर करत असते. तमन्ना बॉलिवूडसह साऊतच्या तमिळ आणि तेलगू चित्रपटांमध्येही काम करते म्हणून तिचे फॅन फॉलोविंग प्रचंड आहे. नुकताच तिने आपला नवीन लूक शेअर केलाय.
तमन्ना भाटियाने तिचे लेटेस्ट फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. चाहते इच्छा असूनही चाहते तिच्या फोटोंतून नजर हटवू शकत नाहीत.रेड ड्रेससह स्टायलिश पर्ससोबत घेतल्याने तिचा अंदाज काहीसा आणखी खुलला आहे.
View this post on Instagram
तमन्नाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अनेकांनी तिच्या या फोटोंवर ‘रेड हॉट’ असं लिहीत थेट हार्टचा इमोजी पोस्ट केला आहे.तर एका युजरने कमेंट करत तिच्या फोटोवरून नजर हटत नसल्याचे म्हंटले आहे. लो मेकअप आणि त्यातही बांधलेले केस तमन्नाला अगदी सूट होत आहेत. तमन्ना नुकतीच ‘बबली बाउन्सर’ या ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या चित्रपटामध्ये दिसली होती. या चित्रपटात तिने लेडी बाउन्सरची भूमिका निभावली होती.