गुवाहाटी – आसामातील कोक्राझार जिल्ह्यात एका बॅंकेवर दरोडा घालण्यासाठी आलेले तीन जण पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ठार झाल्याची घटना काल शनिवारी घडली. हा प्रकार या जिल्ह्यातील भोतगाव येथे घडला.
हे तीन जण बॅंकेवर दरोडा घालण्याच्या इराद्याने आले होते. पोलिसांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्यांनी गोळीबार सुरू केला. पोलिसांनीही प्रत्युत्तरात गोळीबार केला. त्यात हे तीन जण ठार झाले.
काल रात्री उशिरा हा प्रकार घडला. या तीन दरोडेखोरांबरोबरच त्यांचे अन्यही साथीदार तेथे आले होते. त्यांचा शोध आता घेतला जात आहे. ठार झालेल्या दरोडेखोरांकडून वाहने, हत्यारे, गॅस कटर, दोन पिस्तुले आणि एक ऑक्सिजन सिलिंडर अशी उपकरणे सापडली आहेत.