वेराक्रूझ (मेक्सिको) – ग्रेस चक्रिवादळाने मेक्सिकोच्या आखाती किनापट्टीला जोरदार तडाखा दिला आहे. दोन दिवसात हे वादळ मेक्सिकोच्या भूमीवर दुसऱ्यांदा थडकले आहे. त्यामुळे किनारपट्टीबरोबरच अंतर्गत भूप्रदेशातही मोठे नुकसान झाले आहे. या वादळात किमान 8 जणांचा मृत्य झाला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
गुरुवारी मेक्सिकोतील प्रमुख पर्यटन स्थळ असलेल्या युकातन द्विपसुहाला थडकताना या वादळाची तीव्रता खूप कमी झाली होती. मात्र मेक्सिकोच्या वाळवंटी किनारपट्टीवर असलेल्या उष्णतेमुळे हे वादळ पुन्हा शक्तिशाली बनले. त्यानंतर शुक्रवारी हे वादळ मेक्सिकोच्या किनारपट्टीवर आले. वादळामुळे आलेल्या पूरात किमान 8 जणांचा मृत्यू झाला आणि तिघेजण बेपत्ता झाले आहेत.
मध्य मेक्सिकोतील मेक्सिको शहराच्या पूर्व भागातील डोंगराळ प्रदेशात शिरताना हे वादळ सौम्य झाले आणि नंतर शांत झाले असल्याचे युएस नॅशनल हरिकेन सेंटरने म्हटले आहे. यावादळामुळे काही ठिकाणी नदीला पूर आला काही ठिकाणी भूस्खलनही झाले. याठिकाणच्या नागरिकांनी सुखरुप सोडवणे गरडेचे असल्याचेही अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.