नवी दिल्ली : भारताच्या अशू (६७ किलो), आदित्य कुंदू (७२किलो) आणि हरदीप सिंगने (९७ किलो) आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेतील ग्रीको-रोमनमध्ये कांस्यपदकाची कमाई केली. त्यामुळे दोन दिवसांत एका सुवर्णपदकासह भारताच्या पदकांची संख्या पाच झाली आहे.
कांस्यपदकाच्या लढतीत अशूने सिरियाच्या अब्दुल करिम महंमद अल हसनचा ८-१ असा पराभव केला. तर, आदित्य कुंदूने जपानच्या नाओ कुसाकाला ८-० असे पराभूत केले. हरदीप सिंगने किर्गिस्तानच्या बेकसुल्तान माखमुदोव यांचा ३-१ ने पराभव करत कांस्यपदक पटकावले.
Back to back medals for India as Ashu, Aditya Kundu & Hardeep win 3 more bronze medals in Greco – Roman 67kg, 72kg & 97kg categories respectively.
India now has 5 medals at the ongoing #AsianChampionship in Delhi.#WrestleNewDelhi@KirenRijiju @FederationWrest @DGSAI pic.twitter.com/mOl7H9OGVV
— SAI Media (@Media_SAI) February 19, 2020
दरम्यान, ग्रीको-रोमनमध्ये हरप्रीत सिंग (८२ किलो) आणि ज्ञानेंदर (६० किलो) यांना कांस्यपदकाच्या लढतीत पराभव पत्कारावा लागला. ज्ञानेंदरने कांस्यपदकाची लढत ०-६ अशी गमावली.