पुणे – इलेक्ट्रिक वाहनांना पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी केंद्र सरकार विविध प्रयत्न करत आहे. या सुविधा उभारण्याचे मोठे आव्हान आहे. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाच्या मदतीने या सुविधा विकसित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून बीएसएनएल देशभरात काही ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारणारण्यासाठी मदत करणार आहे.
यासाठी बीएसएनएलने सरकारी कंपनी असलेल्या “एनर्जी इफिसायन्सी सर्विसेस’ म्हणजे “इइएसएल’बरोबर सहकार्य करार केला आहे. या करारानुसार “इइएसएल’ प्रत्यक्षात चार्जिंग स्टेशन उभारणार असून बीएसएनएल यासाठी जागा आणि वीज उपलब्ध करून देणार आहे. सुरुवातीच्या काळात किमान 1 हजार चार्जिंग स्टेशन उभारली जाणार असल्याचे सांगण्यात आले. यासाठी गुंतवणूक बीएसएनएलला करावी लागणार नाही. या चार्जिंग स्टेशनचे देखभालही “इइएसएल’ करणार असल्याचे सांगण्यात आले.