शारजा – भारताविरुद्ध पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने प्लेइंग-11 मध्ये बदल केला आहे. दुखापतग्रस्त शाहनवाज दहानी खेळत नाही. त्याच्या जागी मोहम्मद हसनैनला संधी देण्यात आली आहे.
दुसरीकडे भारतीय संघात तीन बदल करण्यात आले आहेत. रवींद्र जडेजा आशिया चषक स्पर्धेतून बाहेर झाला आहे. दिनेश कार्तिकला वगळण्यात आले असून आवेश खानही हा सामना खेळत नाहीये. या तिघांच्या जागी अष्टपैलू दीपक हुडा, हार्दिक पांड्या आणि रवी बिश्नोई यांना संधी देण्यात आली आहे.
Three changes for #TeamIndia going into this game.
Deepak Hooda, Hardik Pandya and Ravi Bishnoi come in the Playing XI.
Live – https://t.co/xhki2AW6ro #INDvPAK #AsiaCup202 pic.twitter.com/ZeimY92kpW
— BCCI (@BCCI) September 4, 2022
दोन्ही संघाची प्लेइंग-11
पाकिस्तान : बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), फखर जमान, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, शादाब खान, आसिफ अली, मोहम्मद नवाज, नसीम शाह, हरिस रौफ, मोहम्मद हसनैन.
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), दीपक हुडा, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.