केप कार्निव्हल – अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था “नासा’ची (NASA) महत्वाकांक्षी चांद्रमोहिम शनिवारी दुसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आली. मात्र रॉकेटमधून इंधनाच्या संभाव्य गळतीमुळे या रॉकेटचे प्रक्षेपण दुसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आले. या आठवड्याच्या सुरुवातीलाच इंधनाच्या गळतीच्या शक्यतेने हे प्रक्षेपण अगदी ऐनवेळी पुढे ढकलण्यात आले होते. आता या रॉकेटच्या दुरुस्तीचे काम पुन्हा सुरू करावे लागणार आहे. आता ऑक्टोबर महिन्यात या रॉकेटचे प्रक्षेपण केले जाईल, असे “नासा’चे व्यवस्थापक बिल नेल्सन यांनी सांगितले.
काल हे प्रक्षेपण पुढे ढकलण्याचा निर्णय या प्रक्षेपणाचे संचालक चार्ली ब्लॅकवेल थॉम्पसन आणि त्यांच्या सहकार्यांनी घेतला. तेंव्हा दोन दिवस या रॉकेटच्या फेरवापराबाबतचा निर्णय दोन दिवसात घेतला जाईल, असे सांगण्यात आले होते.
भविष्यात मनुष्याला चंद्रापवर पाठवण्याच्या मोहिमेच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून या मोहिमेकडे बघितले जात होते. या अंतराळ मोहिमेमधील रॉकेटमध्ये मनुष्याच्या जागेवर डमी अंतराळवीरांना सहभागी करून घेतले जाणार होते.
चंद्रावरील भावी योजनांसाठी अंतराळ सर्वेक्षण आणि दोन आठवड्यांच्या अंतराळ मोहिमेसाठी संशोधकांना सर्व आवश्यक त्या सुविधा निर्माण करण्याच्या हेतून ही मोहिम आखली जात होती.