नवी दिल्ली : बांगलादेशचा यष्टिरक्षक फलंदाज मुशफिकुर रहीम याने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. खुद्द रहीमने 4 सप्टेंबर रोजी सोशल मीडियावर या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
रहिम दीर्घकाळापासून टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खराब फॉर्मशी झुंज देत आहे. रहीम नुकताच आशिया कपमध्ये बांगलादेशी संघाचा भाग होता. बांगलादेशचा संघ आशिया चषकाच्या पहिल्याच टप्प्यात बाहेर पडला. रहीमचा फॉर्म खूपच खराब होता आणि दोन सामन्यांत तो केवळ 5 धावा करू शकला.
मुशफिकुरने सोशल मीडियावर निवृत्तीची घोषणा केली. त्याच्या दीर्घ टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याला पाठिंबा देणाऱ्या लोकांचे त्याने आभार मानले. यासोबतच त्याने बांगलादेश प्रीमियर लीगसह जगभरातील T20 क्रिकेट लीग खेळणे सुरू ठेवण्याची पुष्टी केली.