चांडोली (राजगुरूनगर), चाकण व आळंदी या तीन ग्रामीण रुग्णालयांना लाभ
राजगुरूनगर (पुणे) -महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या आमदार स्थानिक विकास निधी सन 2020-21 मधून चांडोली (राजगुरूनगर), चाकण व आळंदी या तीन ग्रामीण रुग्णालयांना रुग्णवाहिका देण्यात आल्या.
आमदार मोहिते पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी लोकार्पण झाले. यावेळी चाकण ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. माधव कनकवले, आळंदी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. गणपत जाधव, चांडोली ग्रामीण रुग्णालयाचे प्रमुख डॉ. दीपक मुंढे, खेड बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर, जि. प. माजी सदस्य सुरेखाताई मोहिते पाटील, अरुण चांभारे, तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर, सुभाष होले, सुनील थिगळे, मनीषा सांडभोर, ऍड. मनीषा टाकळकर, आशाताई तांबे, सुजाता पचपिंड आदी उपस्थित होते.
यावेळी मेडिकल साहित्य पीपीई कीट, सॅनिटायझर, थर्मल गन, ऑक्सिमीटर, मास्क, सोडीयम हायपोक्लोराईड इ. वस्तूंचे वाटप केले. तालुक्यातील नागरिकांची आरोग्यविषयक सर्व सोयीयुक्त रुग्णवाहिकेमुळे पूर्ण होणार आहे. तालुक्यातील तीनही ग्रामीण रुग्णालयात आता अत्यवस्थ रुग्णाची गैरसोय होणार नाही. त्यांना वेळेत उपचार मिळतील असे अधीक्षक डॉ. माधव कनकवले यांनी सांगितले.