पुणे/औंध – समाजामध्ये कष्ट करणाऱ्याला मानाचे स्थान दिले पाहिजे तो कष्ट करतो काही चोरी करत नाही तो व्यवसाय करतो आणि प्रामाणिकपणे करतो त्यामुळे त्याला समाजात मानाचे स्थान मिळाले पाहिजे असे बाणेर येथे रिक्षाचालक मदत/ सेवा केंद्र शुभारंभ प्रसंगी खासदार गिरीश बापट म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की कोरोना साथीमध्ये रिक्षाचालकांकडून करण्यात आलेले काम कौतुकास्पद आहे. काही रिक्षाचालकांनी आपल्या रिक्षा चे रूपांतर ॲम्बुलन्स मध्ये केले आहे. आजारी रुग्णास तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी ते मोफत सेवा देत आहेत ही एक सामाजिक जबाबदारी रिक्षाचालकांत तर्फे पार पाडली गेली हे काम अत्यंत कौतुकास्पद आहे.
या सेवा केंद्राचे आयोजन नगरसेवक अमोल बालवडकर यांच्यातर्फे करण्यात आले आहे. राज्य सरकारने रिक्षाचालकांसाठी जाहीर केलेल्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी अनेक रिक्षा चालकांना ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी अडचणी येत होत्या. त्यामुळे रिक्षाचालकांच्या सेवेसाठी हे मदत केंद्र चालू करण्यात आले आहे.जास्तीत जास्त रिक्षाचालक बांधवांनी या मदत केंद्राच्या सहाय्याने आपली नोंदणी करुन आपल्या हक्काचे अनुदान मिळवावे असे आवाहन नगरसेवक अमोल बालवडकर यांनी केले.
यावेळी नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेवक किरण दगडे पाटील, कोथरुड मंडल अध्यक्ष पुनित जोशी, स्विकृत नगरसेवक सचिन पाषाणकर, प्रकाशतात्या बालवडकर, राहुल कोकाटे, प्रभाग अध्यक्षा उमा गाडगीळ, महिला आघाडी अध्यक्षा स्वरुपा शिर्के, सरचिटणीस म.मो.अस्मिता करंदिकर, सुंदर बालवडकर, प्रविण आमले, प्रविण बालवडकर, मंदारजी राराविकर, दिलिप बालवडकर, गणेश पाडाळे, सनि बालवडकर, रोनक गोटे, सुमित कांबळे, शनि बालवडकर, ललित कांबळे, प्रसाद बालवडकर व बाणेर-बालेवाडी-पाषाण-सुतारवाडी-सोमेश्वरवाडी-सुस-महाळुंगे परिसरातील रिक्षाचालक बांधव उपस्थित होते.