अभिनेता कुणाल खेमूचा आज म्हणजे 25 मे रोजी वाढदिवस होता. कुणाल बालकलाकार म्हणून आला आणि नायकही झाला. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्यावर मंगळवारी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. त्यात त्याचे चाहते, मित्र आणि कुटुंबातले सदस्य व नातलगांचाही समावेश होता.
त्याच्या नातलगांमध्ये करिना कपूरचाही समावेश होतो. कुणालची पत्नी सोहा अलि खान ही करिनाचा पती सैफची बहीण आहे. त्यामुळे करिनानेही सोशल मीडियाच्या माध्यमातून कुणालला शुभेच्छा दिल्या. मात्र या थोड्या हटके होत्या.
त्याचे कारण त्या देताना करिनाने स्वत:चा कुणालसोबतचा बिकिनीमधील फोटो पोस्ट केला आहे. अर्थात या फोटोत ती एकटी नाही. तर सैफ आणि सोहा आणि करिनाचा तैमुरही त्यात आहेत. स्विमिंग पूलमधील हा फोटो आहे. या सगळ्यांनी कुठेतरी एकत्र घालवलेल्या सुटीच्या दिवसातील तो फोटो आहे व आपण असे पुन्हा सेलीब्रेट करू अशी अपेक्षा करिनाने व्यक्त केली आहे. त्याला कुणालनेही होकार दिला आहे.
सध्याच्या करोनाच्या काळात कुटुंबातील सदस्यही एकत्र येऊ शकत नसल्यामुळे नेटकऱ्यांनीही जरी बोल्ड असला तरी या फोटोचे कौतुक केले आहे. कामाच्या बाबतीत सांगायचे तर करिना पुन्हा सक्रिय झाली असून तिचा आमीरसोबतचा एक चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. इतरही चित्रपटांत ती काम करते आहे.