नवी दिल्ली: आयआयटी बॉम्बेच्या एका रिपोर्टनुसार धक्कादायक बातमी समोर आली आहे. देशातील बँका गरिबांच्या खात्यांमधून सेवा शुल्काच्या नावाखाली पैसे कपात करत असल्याचं समोर आलेलं आहे.
पीएनबी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया या सेव्हिग्ज खातेधारकांच्याकडून पैसे वसूल करणार असल्याचं समोर आलं आहे. बेसिक सेव्हिंग्ज अकाऊंट असलेल्या खातेधारकांना एटीएममधून एका महिन्यात 4 वेळा विनाशुल्क पैसे काढता येणार आहेत.
त्याशिवाय अतिरिक्त वेळा पैसे काढल्यास 15 रुपये आणि त्यावर जीएसटी शुल्क देखील द्यावं लागणार आहे. स्टेट बँकेच्या कोट्यवधी ग्राहकांसाठी हा झटका मानला जातोय.
लाईव्ह मिंट या पोर्टलनं दिलेल्या बातमीनुसार बेसिक सेव्हिंग्ज खातेधारक कोणत्याही एटीएममधून चार वेळा मोफत पैसे काढू शकतो. त्यानंतर एसबीआयच्या एटीएमवरुन पैसे काढले तरी त्याला 15 रुपये आणि जीएसटी शुल्क द्यावं लागणार आहे. हा नियम 1 जुलै पासून लागू होणार आहे.
बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट खात्यांवर आरबीआयच्या नियमानुसार सूट दिली जाते. हे झिरो बॅलन्स अकाऊंट असतं. हे खाते कोणीही काढू शकते. यामध्ये मिनिमम बॅलन्स ठेवावा लागत नाही. खातेधारकांना एटीएम, इंटरनेट बँकिंग, फंड ट्रान्सफर, केंद्र राज्य सरकारांकडून आलेले अनुदानाचे चेक डिपॉझिट करणे इतर सुविधा असतात. ही सेवा फ्री असते.