मुंबई – पठाणच्या जबरदस्त यशानंतर सध्या शाहरुखच्या जवान या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. जवानमधील शाहरुखच्या लुकचा प्रोमो पाहिल्यानंतर या चित्रपटात काहीतरी भन्नाट असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता शाहरुख सोबत या चित्रपटामध्ये साऊथचा स्टायलिश स्टार अल्लू अर्जुन देखील झळकणार आहे.
शाहरुखच्या चित्रपटात एका साऊथ स्टारची एंट्री झाल्याने या चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. अल्लू अर्जुन या चित्रपटात कॅमिओ रोल साकारणार आहे. शाहरुख आणि अल्लूची केमेस्ट्री पाहण्याची आता सर्वांनाच घाई झाली आहे. म्हणूनच सोशल मीडियावर याबाबतची घोषणा होताच अल्लू अर्जुन फॅन्सने याबाबतची आणखी माहिती विचारात कमेंटच वर्षाव केला आहे.
शाहरुखचा लूक रिव्हील करणारा प्रोमो काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला होता. तेव्हाच या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु झाली होती. पठाणच्या जबरदस्त हिटमुळे चाहत्यांच्या शाहरुखकडून अपेक्षा आणखी वाढल्या आहेत. पठाणप्रमाणेच या चित्रपटात देखील शाहरुख देशसेवा करणारे पात्र साकारणार असल्याचे पहिल्या झलकवरून समजले होते.
View this post on Instagram
अल्लू अर्जुन यापूर्वी पुष्पा चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात अल्लू अर्जुनने आपल्या स्वॅग आणि स्टाईलने लाखो मने जिंकली. सुकुमार दिग्दर्शित पुष्पा: द राइज, 2021 मधील ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला होता. आता अल्लू अर्जुन जवानमध्ये दिसणार असल्याची बातमी समजताच चाहत्यांनाही खूप आनंद झाला आहे. शाहरुख आणि अल्लूची जोडी मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.