मुंबई – अभिनेता ‘सुशांत सिंह राजपूत’ याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. यासंदर्भात काहींची चौकशी देखील सुरु आहे. दरम्यान, आता याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुद्धा आपली भूमिका मांडली आहे.
‘सुशांतचा बळी जाण्याचे काही कारण नव्हते, मात्र जर अशाप्रकारे आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्याचे प्रयत्न करत असेल, तर मनसेच्या वतीने त्यांना दणके देण्यात येतील,’ अशा इशारा मनसे नेते अभिजीत पानसे यांनी दिला आहे. सुदैवाने असे प्रकारे मराठी सिनेसृष्टीत घडत नाही, याबद्दल पानसेंनी समाधान व्यक्त केलं आहे. असं देखील पानसे बोलले.