कोल्हापूर – संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणार्या म्हैसाळ आत्महत्या प्रकरणी सांगली पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. 9 जणांच्या कुटुंबाची,ती आत्महत्या नसून,तो हत्याकांड असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 9 जणांना विष घालून मारल्याचे पोलीस तपासामध्ये निष्पन्न झाले असून याप्रकरणी दोघा जणांना अटक करण्यात आली आहे,तर गुप्तधनाच्या प्रकारातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी व्यक्त केला आहे.
याप्रकरणी मांत्रिक धीरज चंद्रकांत सुरवशे (वय 39 रा. वसंतविहार ध्यानेश्वरी प्लॉट आणि अब्बास मोहम्मद अली बागवान (वय वर्षे 48 रा. सर्वदेनगर सोलापूर) या दोघांना अटक करण्यात आली आहे.
मिरज तालुक्यातील म्हैसाळ याठिकाणी 20 जून रोजी एकच वेळी नऊ जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. मृतांमध्ये पशु वैद्यकीय डॉक्टर डॉ.माणिक यल्लप्पा व्हनमोरे आणि त्याचा शिक्षक भाऊ पोपट यल्लप्पा वनमोरे यांच्यासह दोघांच्या आई, पत्नी आणि मुलांचा समावेश होता. डॉ माणिक यल्लप्पा व्हनमोरे पत्नी रेखा माणिकवनमोरे,आई आकताई यल्लप्पा व्हनमोरे,मुलगी प्रतिमा माणिक व्हनमोरे,मुलगा आदित्य माणिक व्हनमोरे,पुतण्या शुभम पोपट वनमोरे यांनी राजधानी हॉटेल जवळ तर दुसऱ्या घरात डॉ.माणिक यांचा भाऊ पोपट यल्लप्पा व्हनमोरे,संगीत पोपट व्हनमोरे,मुलगी अर्चना पोपट व्हनमोरे याच्या घरात मृतदेह आढळून आले होते.
अरुण मोरे कुटुंबीयांच्या कडून एक चिठ्ठी मिळाली होती ज्यामध्ये काही लोकांची नाव घालून हे आयुष्य घेऊन आत्महत्या केल्याचे नमूद करण्यात आलं होते, त्यामुळे ही सामुहिक आत्महत्या सावकारी जाचातून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले होते.त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी 25 जणांच्या विरोधात सावकारकीचे गुन्हे दाखल करत 18 जणांना अटक केली आहे.
मात्र वनमोरे आत्महत्या प्रकरणी अनेक प्रश्न निर्माण झाले होते, नक्की आत्महत्याच आहे,की घातपात, त्याबद्दल हि प्रश्न निर्माण झाला होता. पण पोलिसांच्या तपासामध्ये ती आत्महत्या नसून 9 जणांचा खून झाल्याचं निष्पन्न झाले आहे.
त्याच बरोबर गुप्तधनाच्या प्रकारातून मांत्रिकांच्याद्वारे हा खून करण्यात आल्याचा अंदाज पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान वनमोरे कुटुंबियांचा हत्याकांड कशाप्रकारे करण्यात आला, तो नेमका कोणत्या कारणातून करण्यात आला,
याबाबतचा तपास सुरू असल्याचे दीक्षित गेडाम यांनी सांगितले आहे.