कुस्त्यांच्या आखाड्यासह करमणुकीचे कार्यक्रमही होणार नाहीत
पिरंगुट -पिरंगुट (ता. मुळशी) येथील ग्रामदैवत भैरवनाथाची “करोना’मुळे यात्रा रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती सरपंच चांगदेव पवळे, पोलीस पाटील प्रकाश पवळे, माजी उपसरपंच राजाभाऊ वाघ, माजी सरपंच मोहन गोळे यांनी दिली.
मुळशी तालुक्यातील सर्वांत मोठी गावजत्रा अशी पिरंगुट यात्रेची ओळख आहे. यावर्षी मोठ्या उत्साहात यात्रा साजरी करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, “करोना’मुळे यात्रा रद्द झाली आहे. करमणुकीसाठी आयोजित केलेला लोकनाट्य तमाशा व दुसऱ्या दिवशीचा कुस्त्यांचाही आखाडा रद्द करण्यात आला आहे. केवळ पानफुलांचा कार्यक्रम होणार आहे. ढोल लेझिम पथकांनी येऊ नये, असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
दरवर्षी गुढीपाडव्याला पिरंगुट ग्रामदैवत भैरवनाथाची यात्रा असते. दोन दिवस मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गर्दी असते. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पिरंगुट ग्रामस्थांची नुकतीच यात्रेसंदर्भात तहसीलदार अभय चव्हाण व पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्याबरोबर बैठक झाली, त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. जगभरात थैमान घातलेल्या करोना रोगाच्या पार्श्वभूमीवर तहासीलदार अभय चव्हाण व पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्याशी चर्चा करून खबरदारी म्हणून यात्रा रद्द करण्यात आली आहे.