मुंबई – सोशल मीडियाद्वारे अनेकदा भल्या भल्यांचा टॅलेंट जगासमोर यायला मदत होते. सोशल मीडियावर एखादी कृती जर नेटकऱ्यांना आवडली तर ती व्हायरल होण्यासाठी वेळ लागत नाही. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. जो पाहून तुम्हालाही हसू येईल. या व्हिडिओमध्ये ती व्यक्ती मायकल जॅक्सन स्टाईलमध्ये डान्स करून अनेकांचे मनोरंजन केले आहे.
नेटकरी त्या व्यक्तीच्या डान्स स्टेप्सचे कौतुक करत आहेत. विशेष म्हणजे नशेत असतानाही सुरक्षितपणे नाचू शकल्याबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त करत आहे. सलग दोन मिनिटे ही व्यक्ती अफलातून डान्स करताना दिसत आहे. या व्यक्तीने डान्स दरम्यान अनोख्या स्टाईलने क्रिकेट खेळताच भल्या भल्या हसू अनावर होत आहे. यावेळी त्या व्यक्तीच्या आजूबाजूला मोठी गर्दी झाल्याचे व्हिडीओवरून दिसून येते.
#Crores were spent on one dance program of #MichaelJackson.
Sheer waste of Money😢
Our Brother has done wonders in just 70 rupees.
Court est: #Tasmac (#TN govt #Liquor Outlets)😀😀@ipsvijrk @bhartijainTOI @Cryptic_Miind @MVRaoIPS pic.twitter.com/DYaeMo03WE
— Rupin Sharma IPS (@rupin1992) January 28, 2023
हा व्हिडिओ भारतीय वन सेवेचे अधिकारी रुपिन शर्मा यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी मजेशीर कमेंट देखील केल्या आहेत. याच्या अंगात मायकल जॅक्सन आलाय का ? असा सवाल एका नेटकऱ्याने विचारला आहे तर दुसऱ्याने एवढा टॅलेंट असूनही वाया गेला अशी कमेंट केली आहे. तर एकाने थेट याला सायको जॅक्सन म्हंटले आहे.