सध्या करोनाचा प्रकोप थोडा थंडावलेला दिसत असला तरी धोका पूर्णपणे संपलेला नाही. त्यात सर्दी, खोकला, फ्लू सारखे आजार वाढविणारा हिवाळा सुरू झालेला आहे. अशावेळी आपली रोग प्रतिकरकशक्ती वाढविणे गरजेचे आहे.
या मोसमात येणारी काही फळं आपली प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी खूप उपयुक्त ठरतील. ही फळं सर्दी, खोकला आणि कोरोना विषाणूपासून संरक्षण करण्यात मदत करतात.
चला तर, जाणून घेऊयात या उपयुक्त फळांबाबत….
पेरू – पेरू हे एक सामान्य फळ असले तरी त्याचे फायदे बरेच आहेत. औषधी गुणधर्मांमुळे त्याला ‘अमृत फळ’ असेही म्हणतात. वास्तविक, पेरू व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्ससह समृद्ध आहे, जे रोगापासून बचाव करते. यामध्ये रक्तातील साखर आणि हृदयासाठी फायदेशीर मानल्या जाणार्या फायबरचे प्रमाणही जास्त असते.
पेअर (नाशपाती) – पेरूप्रमाणे, पेअर अथवा नाशपातीदेखील व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्ससह समृद्ध असतात, जे रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करतात. सामान्य सर्दी, फ्लू किंवा इतर अनेक सौम्य आजारांमध्ये नाशपातीसारखे फळ खाण्याचा सल्ला दिला जातो. त्याचे सेवन हृदयरोग कमी करण्यास देखील मदत करते.
संत्री – संत्रीदेखील पोषक तत्वांनी समृद्ध असे फळ आहे. म्हणूनच, हिवाळ्याच्या हंगामात, प्रत्येकास तज्ञांनी ते सेवन करण्याचा सल्ला दिला आहे. संत्रींमध्ये व्हिटॅमिन सी भरलेले असते, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी आवश्यक असते. रोज संत्र्याचा रस पिणेदेखील फायदेशीर आहे.
हंगामी फळं रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात. कारण ते व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडेंट्सने भरलेले आहे. या फळांचे रोज सेवन केल्याने सर्दी आणि सर्दीच्या समस्येमध्ये आराम मिळतोच, शिवाय बॅक्टेरिया आणि विषाणूंविरूद्ध लढायला मदत होते.